अमृत संस्थेच्या सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल प्रशिक्षणार्थ्यांकडून समाधान व्यक्त

नागपूरमधील प्रशिक्षणार्थ्यांच्या बॅचला संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट

अमृत संस्थेच्या सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल प्रशिक्षणार्थ्यांकडून समाधान व्यक्त मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल प्रशिक्षणार्थ्यांकडून समाधान व्यक्त अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी पाहून या संस्थेतर्फे राबवला जाणारा अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. हे प्रशिक्षण सुरू असलेल्या केंद्राला अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी भेट दिली आणि प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रशिक्षणात दिली जाणारी माहिती, उपलब्ध सुविधा, तसेच प्रशिक्षणाचा दर्जा आणि व्यवस्थापन याबाबत लाभार्थ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून या प्रशिक्षणातून रोजगाराभिमुख व उपयुक्त कौशल्ये मिळत असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी प्रशिक्षक प्रशांत बोरकर, तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या तुकडी समन्वयक सौ. ज्योती धिरडे आदी उपस्थित होते. 

सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दिशेने सक्षम करणे हे या प्रशिक्षणाचे प्रमुख ध्येय आहे. या प्रशिक्षणामध्ये सोलर पॅनेल उभारणी, सोलर सिस्टीम इंस्टॉलेशन, वायरिंग, देखभाल व दुरुस्ती, सुरक्षितता उपाययोजना तसेच तांत्रिक माहिती देण्यात येत असून, प्रात्यक्षिकांद्वारे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना सौर ऊर्जा क्षेत्रात कुशल तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 06:51 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 06:51 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words