साडेसहा हजार रुपयांचा लाभ
सातारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कौशल्यविकास आणि शैक्षणिक सवलत योजनेअंतर्गत विश्वाक्ष आचार्य या विद्यार्थ्याला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. विश्वाक्ष यांना टायपिंग आणि शॉर्टहँडच्या शासकीय परीक्षेच्या साडेसहा हजार रुपयांच्या शुल्काचा परतावा नुकताच मंजूर करण्यात आला.
अमृत ही संस्था राज्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक कौशल्यांसाठी सातत्याने प्रोत्साहन देत असते. याच धोरणाचा भाग म्हणून तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना फीचा परतावा देऊन त्यांचा आर्थिक भार हलका केला जात आहे.
या मदतीमुळे विश्वाक्ष यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मदत झाली आहे. 'अमृत संस्थेकडून प्राप्त झालेल्या आर्थिक मदतीचा मला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल,' असे सांगून त्यांनी संस्थेचे आभार मानले आहेत. अशा प्रकारच्या योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये विकसित करण्यास नवी उमेद मिळत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment