ड्रोन पायलट होऊन करिअरला घेऊ द्या भरारी...! मोफत प्रशिक्षणासाठी जालन्यात नावनोंदणी सुरू

खुल्या प्रवर्गासाठी अमृत संस्थेचा रोजगाराभिमुख उपक्रम

ड्रोन पायलट होऊन करिअरला घेऊ द्या भरारी...! मोफत प्रशिक्षणासाठी जालन्यात नावनोंदणी सुरू  मुख्य फोटो
ड्रोन पायलट होऊन करिअरला घेऊ द्या भरारी...! मोफत प्रशिक्षणासाठी जालन्यात नावनोंदणी सुरू  अतिरिक्त फोटो

जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात ड्रोन ऑपरेशन, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान, तसेच ड्रोनच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यावर लाभार्थ्यांना ड्रोन पायलट म्हणून सर्टिफिकेट मिळणार असून, त्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

शेती, बांधकाम, फोटोग्राफी, सर्वेक्षण व पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रात ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे ग्रामीण भागातही तंत्रज्ञानाधारित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृत संस्थेचा हा उपक्रम युवक-युवतींसाठी उपयुक्त ठरणार आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

नितीन खेकाळे - 7391065474

जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

चिंतेश जोशी - 9421944752

जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, 

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in





Publisher: Nitin khekale News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 10:40 AM News publication time | Views: 319 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news
Publisher: Nitin khekale News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 10:40 AM News publication time | Views: 319 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words