ह. भ. प. अक्षयमहाराज भोसले यांच्याकडून अमृत संस्थेला शुभेच्छा

नांदेड कार्यालयाकडून सत्कार

ह. भ. प. अक्षयमहाराज भोसले यांच्याकडून अमृत संस्थेला शुभेच्छा मुख्य फोटो
ह. भ. प. अक्षयमहाराज भोसले यांच्याकडून अमृत संस्थेला शुभेच्छा अतिरिक्त फोटो

नांदेड : शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष व वारकरी संप्रदाय युवा मंचाचे अध्यक्ष ह. भ. प. अक्षयमहाराज भोसले यांचा अमृत संस्थेच्या नांदेड जिल्हा कार्यालयाकडून जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी शाल व अमृत दिनदर्शिका देऊन सत्कार केला. त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल जाणून घेतले. अमृत संस्थेकडून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, याची माहिती त्यांनी घेतली. तसंच, लाभार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, लाभार्थ्यांची संख्या किती अशा प्रकारची विचारणा करून ह. भ. प. भोसले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. अमृत संस्थेच्या कार्यासाठी अभिनंदन करून त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in



Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 10:09 AM News publication time | Views: 193 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 10:09 AM News publication time | Views: 193 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words