उमरखेडचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराजांच्या अमृत संस्थेला शुभेच्छा

अमृत संस्थेकडून करण्यात आला यथोचित सन्मान

उमरखेडचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराजांच्या अमृत संस्थेला शुभेच्छा मुख्य फोटो
उमरखेडचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराजांच्या अमृत संस्थेला शुभेच्छा अतिरिक्त फोटो

बीड : अध्यात्म, सेवा व समाजप्रबोधनाच्या कार्यासाठी परिचित असलेले उमरखेड (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज यांनी अमृत संस्थेचे जालना जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांच्या निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे महाराजांचा यथोचित सन्मान करण्यात आला. अमृत संस्थेच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून महाराजांनी समाजोपयोगी, लोककल्याणकारी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या आणि अमृत संस्थेला आशीर्वाद दिले. 


या वेळी चिंतेश जोशी यांच्या परिवाराने परमपूज्य महाराजांची पाद्यपूजा करून पारंपरिक पद्धतीने आदरपूर्वक सत्कार केला. अमृत संस्थेची दिनदर्शिका महाराजांना सप्रेम भेट देण्यात आली. अमृत संस्थेच्या माध्यमातून राज्यभर राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्वावलंबनाच्या योजनांची सविस्तर माहिती महाराजांना देण्यात आली.


अमृत ही स्वायत्त संस्था ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. युवक-युवतींसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार निर्मिती, लघुउद्योगांना प्रोत्साहन, उद्योजकता विकास प्रशिक्षण, व्याजपरतावा योजना तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून अमृत संस्था समाजात आर्थिक स्वावलंबनाची चळवळ उभी करत आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगारनिर्मिती केली आहे.


अमृत संस्थेच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून महाराजांनी समाजोपयोगी, लोककल्याणकारी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या आणि अमृत संस्थेला आशीर्वाद दिले. सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील या सकारात्मक संवादामुळे अशा उपक्रमांना बळ मिळण्यास मदत होणार आहे.

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 07:08 PM News publication time | Views: 635 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 07:08 PM News publication time | Views: 635 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words