परभणीत अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ

वीस लाभार्थ्यांनी घेतला सहभाग

परभणीत अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्य फोटो
परभणीत अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ अतिरिक्त फोटो

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) या कार्यक्रमाची परभणीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक चंद्रकांत अळनुरे उपस्थित होते. 

उद्घाटन कार्यक्रमाला अमृत संस्थेचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक ओमकार शेटे, प्रशिक्षक संतोष चौधरी, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृतमित्र अनंतराव जोगदंड, अमृतसखी मयुरी टेळकीकर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये वीस लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. लक्ष्यित गटातील व्यावसायिकांना लाभ व्हावा, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी त्यांना उपलब्ध व्हाव्यात, हा यामागचा उद्देश आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी संतोष चौधरी यांनी व्यवसाय आणि उद्योजकतेची ओळख या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.  

संतोष चौधरी म्हणाले, की 'ईडीपी कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला गती मिळेल. अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण उपक्रम शहरांच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.'

या कार्यक्रमामध्ये नवउद्योजकांना व्यवसायसंधी, कौशल्यविकास, आर्थिक नियोजन, मार्केटिंग, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी लाभार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065473

अमृत जिल्हा कार्यालय, 

जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, 

बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 04:28 PM News publication time | Views: 5,395 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 04:28 PM News publication time | Views: 5,395 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words