बीडमधील व्यापारी सुरेश सारडा यांना मिळाला ‘अमृत’च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ

बीड : सुरेश कचरूलाल सारडा हे नाथापूर (जि. बीड) येथील छोटे किराणा व्यापारी असून, त्यांना ‘अमृत’च्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ झाला आहे. त्यांच्या व्याजपरताव्याचा पहिला हप्ता त्यांना प्रदान झाल्यावर त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने नियमित कर्जफेड करणे अपेक्षित असून, दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याज लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते.

बीडमधील व्यापारी सुरेश सारडा यांना मिळाला ‘अमृत’च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : सुरेश कचरूलाल सारडा हे नाथापूर (जि. बीड) येथील छोटे किराणा व्यापारी असून, त्यांना ‘अमृत’च्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ झाला आहे. त्यांच्या व्याजपरताव्याचा पहिला हप्ता त्यांना प्रदान झाल्यावर त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने नियमित कर्जफेड करणे अपेक्षित असून, दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याज लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते.

सुरेश सारडा यांनी व्यवसायवृद्धीसाठी कर्ज घेतले आहे. पूर्णवादी नागरी सहकारी बँकेतून (मोंढा शाखा, बीड) त्यांना १४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जासाठी त्यांनी अमृतच्या व्याजपरतावा योजनेकरिता अर्ज केला. आवश्यक ती पूर्तता केल्यानंतर त्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अमृत संस्थेतर्फे व्याजाची रक्कम परत मिळाल्याबद्दल सारडा यांनी अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल अशोकराव जोशी यांची भेट घेऊन मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांचे मनोगत सोबतच्या व्हिडिओत ऐकता येईल.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था (AMRUT)असून, खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, मारवाडी, माहेश्वरी, गुजराती, सिंधी इत्यादी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकताविषयक विविध योजना उपलब्ध करून देत आहे.

व्याज परतावा योजनेमुळे लाभार्थ्यांवरील कर्जाचा ताण कमी होत असून, व्यवसाय विस्तार आणि आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळत आहे. बीड जिल्ह्यातील अनेक लाभार्थी या योजनेतून फायदा घेत असून, अधिकाधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
विशाल अशोकराव जोशी, बीड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
मोबाइल : 7391065468, 9421173251
अमृत जिल्हा कार्यालय : अथर्व कॉम्प्लेक्स, पहिला मजला, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड.

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 25-11-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words