अमृत संस्थेची कार्यपद्धती घेतली जाणून
भिवापूर (जि. नागपूर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या प्रतिनिधींनी भिवापूर तहसील कार्यालयात तहसीलदार श्री. राठोड यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीमध्ये तहसीलदारांना अमृत संस्थेची कार्यपद्धती, विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम, तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेच्या दिनदर्शिकादेखील त्यांना देण्यात आली. तहसीलदार श्री. राठोड यांनी अमृत संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून संस्थेच्या कार्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच भविष्यात अमृत संस्थेच्या उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, अमृतमित्र निखिल देशपांडे उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment