भिवापूरमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमाची नवी तुकडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

अमृत संस्थेच्या नागपूरच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घेतली बैठक

भिवापूरमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमाची नवी तुकडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा मुख्य फोटो
भिवापूरमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमाची नवी तुकडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा अतिरिक्त फोटो

भिवापूर (जि. नागपूर) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त अमृत संस्थेच्या वतीने भिवापूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, नागपूर जिल्हा उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, तसेच अमृतमित्र निखिल देशपांडे उपस्थित होते. भिवापूर परिसरात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाची (ईडीपी) नवीन बॅच सुरू करण्याबाबत स्थानिक नागरिक, युवक आणि लक्ष्यित गटाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या वेळी डॉ. प्रदीप गुप्ता यांनी संपूर्ण गावातील लक्ष्यित गटातील इच्छुक लाभार्थ्यांची एकत्रित बैठक घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हा व्यवस्थापकांना करण्यात आली. त्यांच्या सहकार्याने नवीन युवकांना कसे एकत्रित करता येईल व त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांशी कसे जोडता येईल, यावरही सखोल चर्चा झाली. या उपक्रमामुळे भिवापूर तालुक्यातील युवक व लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, आगामी काळात येथे ईडीपी कार्यक्रमाची बॅच सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 01:37 PM News publication time | Views: 79 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 01:37 PM News publication time | Views: 79 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words