छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला दिली भेट
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. द अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर विनोद अग्रवाल यांनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत अग्रवाल यांनी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम, व्याजपरतावा योजना, तसेच लक्ष्यित गटासाठीच्या सक्षमीकरण कार्यक्रमांची सविस्तर माहिती घेतली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी त्यांना सर्व योजना, त्यांची उद्दिष्टे व लाभार्थ्यांसाठी असलेली प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली. या वेळी अमृत कार्यालयाकडून विनोद अग्रवाल यांचे स्वागत करून त्यांना अमृत दिनदर्शिका भेट देण्यात आली. ही भेट दोन संस्थांच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, लक्ष्यित घटकांच्या आर्थिक व व्यावसायिक प्रगतीला निश्चितच हातभार लावणारी ठरेल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको,
हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment