ब्राह्मण मंचाचे दत्ताजी घन यांनी घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला भेट

ब्राह्मण मंचाचे दत्ताजी घन यांनी घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. ब्राह्मण मंचाचे संचालक दत्ताजी घन यांनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय चंद्रकांत लंबे यांनी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण योजना, उद्योजकता प्रशिक्षण, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, अमृत बेकरी प्रशिक्षण, अमृत आयात-निर्यात, तसेच व्याजपरतावा अशा योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या योजनांमुळे समाजातील गरजू घटकांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळत असून, अनेक नागरिक स्वतःचा व्यवसाय सुरू करून सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी लंबे यांनी घन यांना अमृत दिनदर्शिका भेट दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, 

पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, 

हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in



Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 04:36 PM News publication time | Views: 155 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 04:36 PM News publication time | Views: 155 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words