विजय जोशी यांचे सांगलीतील महिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन
सांगली : 'अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून प्रशिक्षण घेऊन महिलांनी व्यवसाय उभा करावा. अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची ऑनलाइन पद्धतीने विक्री करून सक्षम व्हावे. लक्ष्यित गटातील उद्योजकांच्या पाठीशी अमृत संस्था भक्कमपणे उभी आहे. लवकरच अमृतपेठ प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष स्टॉल्सच्या माध्यमातून कार्यरत होणार आहे,' असे प्रतिपादन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले. २५ जानेवारी रोजी सांगलीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित महिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. अशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शनाचा प्रयोग प्रथमच राबवण्यात आला होता.
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत संस्था, सांगलीतील अजिंक्य वूमन्स फाउंडेशन आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजिकांसाठी डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण कार्यशाळा व हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व वयोगटातील महिला या वेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. कविता कुलकर्णी यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. सुमेध जोशी यांनी सोप्या शब्दांत व्यवसायाच्या जाहिरातीसाठी ऑनलाइन मार्केटिंगची आवश्यकता विशद केली. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती करून नवीन ग्राहक कसे मिळवावेत आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात व्यवसाय कसा वाढवावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
सौ. मंजिरी गाडगीळ यांनी विजय जोशी यांचे आभार मानले. तसेच समाज भगिनींनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा असे आवाहन केले. या वेळी चितळे उद्योगसमूहाच्या सौ. अनघा चितळे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार, अमृतसखी गौरी कुलकर्णी, कविता कुलकर्णी, लीना कुलकर्णी, अनीता वाटवे, मानसी परसनीस आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शैलेंद्र जहागीरदार ९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९
पत्ता : अमृत संस्थेचे जिल्हा कार्यालय,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,
राजवाडा, सांगली - ४१६४१६
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment