अमरावतीत अमृत कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

१० दिवसांच्या उपक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार उद्योजकतेचे धडे

अमरावतीत अमृत कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य फोटो
अमरावतीत अमृत कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेतर्फे कौशल्यवर्धन प्रशिक्षण अर्थात उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) राबवला जात आहे. या प्रशिक्षणाच्या तुकडीचा उद्घाटन सोहळा अमृत संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयात पार पडला. २७ जानेवारी ते सहा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. या वेळी अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर उपस्थित होते. 

या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय व उद्योजकतेची ओळख, व्यक्तिमत्त्व विकास, कच्चा माल गुणवत्ता व खरेदी व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, जाहिरात व प्रसार, विक्री व बाजार व्यवस्थापन आदी व्यवसायाशी संबंधित विषयांचे सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात येणार आहे.

विविध शासकीय परवाने व नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अमृत संस्थेच्या अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविषयी माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांना डिजिटल माध्यमातून विक्रीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

केदार गोगरकर - 9112227635 

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

ऋषीकेश कथलकर - 7249451152 

जिल्हा उपव्यवस्थापक

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, घर क्रमांक ३३,

आशीर्वाद बिल्डिंग, विदर्भ हाउसिंग कॉलनी, 

मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,

अमरावती - ४४४६०२

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 09:13 AM News publication time | Views: 4,722 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 09:13 AM News publication time | Views: 4,722 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words