वणी (जि. यवतमाळ) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या महाराष्ट्रातील पहिल्या अमृत माहिती केंद्राची स्थापना यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. नऊ डिसेंबर रोजी या केंद्राचे उद्घाटन ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले.
वणी (जि. यवतमाळ) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या महाराष्ट्रातील पहिल्या अमृत माहिती केंद्राची स्थापना यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. नऊ डिसेंबर रोजी या केंद्राचे उद्घाटन ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. ॲड. परितोष पानट यांच्या कार्यालयात (पाध्ये गल्ली, शिवाजी आखाड्याजवळ) हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विजय जोशी यांनी सांगितले, ‘अमृत माहिती केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मार्गदर्शन, माहिती व संधी यांचे एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. शासकीय योजना, दस्तऐवज प्रक्रिया, प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता विकास, तसेच संशोधन व तंत्रज्ञानविषयक साह्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.’
या कार्यक्रमाला अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा, उपव्यवस्थापक कामेश राखे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment