'अमृत'च्या ॲडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्समधून घडतील यशस्वी उद्योजिका

छत्रपती संभाजीनगरमधील कोर्सची झाली सांगता

'अमृत'च्या ॲडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्समधून घडतील यशस्वी उद्योजिका मुख्य फोटो
'अमृत'च्या ॲडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्समधून घडतील यशस्वी उद्योजिका अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या महिन्याभराच्या ॲडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्सची सांगता झाली. या कोर्सला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आगामी काळात त्या यशस्वी उद्योजिका म्हणून उभ्या राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शहरातील सुदर्शननगर येथील ड्रीम्स ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये हा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम २३ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या कोर्समध्ये ब्युटी पार्लर क्षेत्रातील नोकरीच्या संधी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, उद्योजकीय कौशल्ये, ग्राहकवाढ, बाजारपेठेचे नियोजन, तसेच उत्पन्नवाढीच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, कर्जविषयक माहिती आणि अन्य शासकीय योजनांचीही सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली.

समारोप कार्यक्रमात अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी लक्ष्यित गटातील महिलांना व्यवसाय विस्तार या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आगामी काळात त्या यशस्वी उद्योजिका म्हणून उभ्या राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या वेळी अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, एमसीईडी प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती सोसे, तसेच ड्रीम्स ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका वनिता शिंदे उपस्थित होत्या. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, 

पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, 

हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 06:10 PM News publication time | Views: 3,823 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 06:10 PM News publication time | Views: 3,823 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words