'सांस्कृतिक वार्तापत्र'च्या व्यवस्थापक सुनीता पेंढारकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल व्यक्त केले समाधान

छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला सदिच्छा भेट

'सांस्कृतिक वार्तापत्र'च्या व्यवस्थापक सुनीता पेंढारकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल व्यक्त केले समाधान मुख्य फोटो
'सांस्कृतिक वार्तापत्र'च्या व्यवस्थापक सुनीता पेंढारकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल व्यक्त केले समाधान अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : 'सांस्कृतिक वार्तापत्र'च्या व्यवस्थापक श्रीमती सुनीता पेंढारकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी अमृत संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेतली.

अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कौशल्यविकास, उद्योजकता प्रशिक्षण, व्याजपरतावा, तसेच रोजगाराभिमुख योजना राबवण्यात येतात. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी त्याविषयीची माहिती पेंढारकर यांना दिली. या योजनांमुळे समाजातील गरजू घटकांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी अक्षय लंबे यांनी पेंढारकर यांना अमृत संस्थेची दिनदर्शिका भेट दिली. अमृत संस्थेच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून पेंढारकर यांनी या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, 

पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, 

हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 05:17 PM News publication time | Views: 435 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 05:17 PM News publication time | Views: 435 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words