मारवाडी युवा मंच आणि राजस्थानी सेवा समितीने केले आयोजन
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी अमरावतील जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. मारवाडी युवा मंच आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक इच्छुक नागरिक या वेळी उपस्थित होते.
या वेळी अमृत कौशल्य उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध मोफत प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होतात, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, तसेच उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर उपस्थित होते. त्यांनी अमृत संस्थेच्या उद्दिष्टांबाबत माहिती देऊन खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूरज मिश्रा यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. समाजाचे अध्यक्ष श्री. राठी आणि सचिव श्री. जोशी हेही या वेळी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना अमृत दिनदर्शिका देण्यात आल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - ९११२२२७६३५
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment