मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन
नांदेड : आद्य मराठी पत्रकार, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, 'व्हॉइस ऑफ मीडिया'चे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा ब्राह्मण महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड कार्यालयाकडून पांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment