पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानाने आयोजित केला अमृत योजनांचा परिचय मेळावा

सुधागड तालुक्यातून चांगला प्रतिसाद

पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानाने आयोजित केला अमृत योजनांचा परिचय मेळावा  मुख्य फोटो
पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानाने आयोजित केला अमृत योजनांचा परिचय मेळावा  अतिरिक्त फोटो

पाली (जि. रायगड) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या योजनांचा परिचय लक्ष्यित गटातील नागरिकांना व्हावा, यासाठी पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानातर्फे योजना परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सुधागड तालुक्यात लवकरच अमृत संस्थेच्या योजना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे.

या परिचय मेळाव्याला सुधागड तालुक्यातून संस्थेच्या सर्व लक्ष्यित गटांतील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे आणि जिल्हा उपव्यवस्थापक मंगेश ढेबे यांनी या वेळी संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. खुल्या प्रवर्गासाठीही शासकीय संस्था काम करते, हे उपस्थितांना पहिल्यांदाच कळले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. सर्वांनी योजनांची माहिती समजून घेतली. त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन शैलेश मराठे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाली तालुका ब्राह्मण समाज अध्यक्ष धनंजय गद्रे यांनी केले. आभारप्रदर्शन बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी केले. आभारप्रदर्शनामध्ये त्यांनी उपस्थित सर्वांना आवर्जून सांगितले, की 'आपण व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशाला पुढे न्यायचे असेल, तर आपण व्यावसायिक बनणे महत्त्वाचे आहे. अमृत ही संस्था त्यासाठी आपल्याबरोबर आहे.' 

अमृत संस्थेच्या कार्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. गरजेनुसार आपण स्वतः अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ, तसेच आणखीही जास्तीत जास्त जणांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवू, अशी ग्वाहीही उपस्थितांनी दिली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words