ब्रह्मपुरीत सुरू झाला अमृत संस्थेचा ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम

प्रशिक्षणार्थ्यांना मिळतेय व्यवसाय उभारणीच्या महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती

ब्रह्मपुरीत सुरू झाला अमृत संस्थेचा ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
ब्रह्मपुरीत सुरू झाला अमृत संस्थेचा ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम अतिरिक्त फोटो

ब्रह्मपुरी : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये ब्युटी पार्लर या विषयावर महिन्याभराचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम २३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाला अमृत संस्थेचे नागपूर विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, ब्रह्मपुरी तालुक्याचे अमृतमित्र वेदान्त मेहता व 'एमसीईडी'चे जिल्हा समन्वयक संदीप जाणे यांनी भेट दिली. या वेळी विक्रम पांडे यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देऊन व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षणार्थींना सांगितल्या. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मविश्वास मिळत असून, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर क्षेत्रातील नोकरीच्या संधी, स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा, उद्योजकीय कौशल्ये, ग्राहक कसे वाढवायचे, बाजारपेठेचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. तसेच अमृत संस्थेच्या विविध योजना, कर्जविषयक माहिती आणि इतर शासकीय योजनांची माहितीही प्रशिक्षणार्थ्यांना दिली जात आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ब्रह्मपुरी येथील माधुरी ब्युटी पार्लर येथे सुरू असून, सेंटरच्या संस्थापक संचालिका माधुरी जीभकाटे प्रशिक्षण देत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

विक्रम मोहन पांडे - 9112228774

चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, 

तुकूम, चंद्रपूर - 442402

ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 1,154 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news
Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 1,154 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words