नंदुरबारमध्ये २५ जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक शिबिर

अमृत संस्थेच्या स्पर्धा परीक्षाविषयक आणि अन्य योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

नंदुरबारमध्ये २५ जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक शिबिर मुख्य फोटो
मुख्य फोटो

नंदुरबार : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील टोकरतलाव या गावी २५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, या लक्ष्यित घटकांतील विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या स्पर्धा परीक्षांविषयक, तसेच अन्य विविध योजनांचे मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे. २५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता टोकरतलाव येथील हनुमान मंदिरात हे शिबिर होणार असून, अमृत संस्थेचे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. खुल्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 285 Number of times this news has been viewed | District: nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 285 Number of times this news has been viewed | District: nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words