दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची झाली बैठक
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी अमरावती जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शोएब कादरी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी जिल्ह्यातील उद्योग, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासासंबंधी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार व उद्योगनिर्मितीला चालना मिळावी, यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.
अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम व उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना मार्गदर्शन व साह्य उपलब्ध करून देण्याचेही ठरवण्यात आले. ही भेट फलदायी ठरली असून, उद्योग व रोजगार क्षेत्रात समन्वयातून अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment