शिर्डीतील ब्राह्मण एकता संस्थेचे अमृत संस्थेला सहकार्य

योजनाप्रसाराच्या कार्यात हातभार

शिर्डीतील ब्राह्मण एकता संस्थेचे अमृत संस्थेला सहकार्य मुख्य फोटो
शिर्डीतील ब्राह्मण एकता संस्थेचे अमृत संस्थेला सहकार्य अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी शिर्डी येथील ब्राह्मण एकता संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील व खजिनदार संजय धनेश्वर यांची भेट घेतली. त्यांना अमृत दिनदर्शिका भेट देण्यात आली. अमृत संस्थेच्या योजना लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी ब्राह्मण एकता संस्थेचे नेहमी सहकार्य असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिर्डी येथे अमृत संवाद मेळावा आयोजित केला होता. अमृत संस्थेतर्फे वैभव पाटील यांचे आभार मानण्यात आले. लक्ष्यित गटातील सर्वांच्या हितासाठी अमृत संस्थेला नेहमी सहकार्य असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769.

कार्यालय पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, 

अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 10:01 PM News publication time | Views: 493 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 10:01 PM News publication time | Views: 493 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words