प्रजासत्ताकदिनी सांगलीत अमृत संस्थेतर्फे सिंधी समाज मेळावा

विविध प्रकारच्या योजनांची दिली जाणार माहिती

प्रजासत्ताकदिनी सांगलीत अमृत संस्थेतर्फे सिंधी समाज मेळावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि सांगलीतील सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनी अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सांगली सिंधी पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष हेमंतदास पोपटाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार आणि सौ. गौरी महेश कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील जातींसाठी काम करते आणि त्यात सिंधी समाजाचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना अन्य कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी इत्यादी जातींचा समावेश आहे.

कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक अशा सर्वांसाठी अमृत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, अमृत कौशल्य प्रशिक्षण योजना आदींची माहिती सिंधी समाजाला व्हावी यासाठी हा अमृत मेळावा आयोजित केला आहे. 

या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार, तसेच सौ. गौरी महेश कुलकर्णी उपस्थित राहून योजनांची माहिती देणार आहेत. तसेच उपस्थितांना शंका विचारता येणार असून, त्यांचे निरसन केले जाणार आहे. हा प्रकारचा कार्यक्रम या भागात प्रथमच होत असून, लक्ष्यित गटातील बंधू-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि आपल्यासह समाजाचा उत्कर्ष साधावा, असे आवाहन सांगली सिंधी पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष हेमंतदास पोपटाणी यांनी केले आहे.

दिवस : २६ जानेवारी २०२६

वेळ : सकाळी नऊ वाजता

स्थळ : सिंधू सांस्कृतिक भवन,

श्यामराव नगर, सांगली 

अधिक माहितीसाठी संपर्क : 

९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९ 

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर, 

राजवाडा, सांगली ४१६४१६


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 05:28 PM News publication time | Views: 412 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 05:28 PM News publication time | Views: 412 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words