सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे सुरू होतोय कौशल्य उद्यम वर्धन उपक्रम

खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे सुरू होतोय कौशल्य उद्यम वर्धन उपक्रम मुख्य फोटो
सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे सुरू होतोय कौशल्य उद्यम वर्धन उपक्रम अतिरिक्त फोटो

सोलापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सोलापूर जिल्ह्यात अमृत कौशल्य उद्यम वर्धन (ईडीपी) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पात्र तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​अमृत संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात लवकरच विविध प्रकारच्या प्रशिक्षणांच्या नवीन बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अमृत अन्नपूर्णा (खाद्य प्रक्रिया), अमृत सूर्यमित्र (सौर ऊर्जा), अमृत अलंकार (दागिने निर्मिती), अमृत आयात-निर्यात आणि कॉमन सर्व्हिस सेंटर यांसारख्या आधुनिक कोर्सेसचा समावेश आहे. या प्रशिक्षणातून केवळ तंत्रज्ञच नाही, तर सक्षम उद्योजक घडवण्यावर संस्थेचा भर आहे.

​ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील जाती (उदा. ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, सिंधी, जैन, कायस्थ इ.) आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्ती या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

​सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी 'अमृत'च्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

​संपर्क क्रमांक : 9112228768, 8669589834, 9145281104

पत्ता : 108 A, श्री साई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर तीन, तिसरा मजला, 

यतिराज हॉटेलच्या पुढे, ड्रायफ्रूट हाउसच्या बोळात, 

सातरस्ता, मोदी खाना, सोलापूर - ४१३००१

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode,Arya kulkarni News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 03:57 PM News publication time | Views: 338 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode,Arya kulkarni News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 03:57 PM News publication time | Views: 338 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words