खुल्या प्रवर्गातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने उत्तम संधी
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात निःशुल्क ब्युटी पार्लर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्याची पहिली तुकडी २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, विविध प्रकारचे निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रमात ब्रायडल मेकअप, बेसिक पार्लर ट्रेनिंग, फेशियल, क्लीन-अप, थ्रेडिंग, वॅक्सिंग, हेअर स्टायलिंग, स्किन केअर, तसेच सौंदर्य व्यवसायाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायातील मूलभूतपासून व्यावसायिक पातळीपर्यंतची कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. महिलांना स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक भांडवल, ग्राहक व्यवस्थापन, स्वच्छता, दर्जेदार सेवा व उत्पन्नवाढीच्या संधी यांवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व आत्मविश्वास मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अमृत संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment