'अमृत'च्या उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी मिळणार विदर्भातील प्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांचे साह्य

अमरावती विभागीय कार्यालयाला भेट देऊन घेतली माहिती

'अमृत'च्या उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी मिळणार विदर्भातील प्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांचे साह्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : विदर्भातील प्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांनी अमृत संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयाला भेट देऊन अमृत संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली. अमृत दुर्गोत्सव उपक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद होऊन मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती घेऊन प्रज्ञा राऊत यांनी कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. गावागावात पोहोचून खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा अमृत संस्थेचा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अमृतकडून राबविले जाणारे प्रशिक्षण उपक्रम, स्वयंरोजगारासाठी केले जाणारे व्यावसायिक मार्गदर्शन, युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यावर असलेला भर, तसेच सरकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रभावी पद्धत या बाबींनी आपल्याला विशेषत्वाने प्रभावित केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सामाजिक जाणिवेचे विषय वऱ्हाडी भाषेत सहजपणे मांडण्यात प्रज्ञा राऊत यांचा हातखंडा असून अमृतच्या सामाजिक उपक्रमांना यापुढेही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी दी व्हायरल व्हिजन सोशल मीडिया कंपनीचे संचालक चंद्रेश भट्टी हेही उपस्थित होते. त्यांनीदेखील अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देऊन सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर व अमृत कर्मचारी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 492 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 492 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words