महाविद्यालयाचा सकारात्मक प्रतिसाद
नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे आणि अमृतसखी सौ. दर्शना जाब्रस यांनी डीएमसी महाविद्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक सोपानदेव पिसे आणि विभागप्रमुख नितीन कराले यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व उद्दिष्टांबाबतची माहिती त्यांना देण्यात आली आणि अमृत दिनदर्शिका त्यांना देण्यात आली.
या वेळी अमृत संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराभिमुख उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोपानदेव पिसे आणि नितीन कराले यांनी अमृत संस्थेकडून असलेल्या काही अपेक्षा, सूचना व सहकार्याच्या शक्यतांबाबत आपले मत व्यक्त केले. त्या अपेक्षा जाणून घेऊन भविष्यात अमृत व डीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या संवादामुळे अमृत संस्था व शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत होऊन विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यास चालना मिळणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment