कोल्हापूरच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दीपा ठाणेकर यांचा अमृत संस्थेकडून सत्कार

संस्थेच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे दिले आश्वासन

कोल्हापूरच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दीपा ठाणेकर यांचा अमृत संस्थेकडून सत्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल सौ. दीपा अजित ठाणेकर यांचा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गाच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. संस्थेच्या कोल्हापूर शहरातील लक्ष्यित गटापर्यंत संस्थेचे कार्य पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच शहरामधील लक्ष्यित गटातील युवक व महिला यांच्यासाठी संयुक्त उपक्रम राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

सौ. ठाणेकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेच्या उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडवता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 01:43 PM News publication time | Views: 401 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 01:43 PM News publication time | Views: 401 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words