अमृत संस्थेमुळे ग्रामीण भागातील व्यक्तीही पूर्ण करू शकतात ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न

अहिल्यानगरमधील लाभार्थी यश जोशी यांनी निःशुल्क आणि दर्जेदार प्रशिक्षणाबद्दल व्यक्त केले समाधान

अमृत संस्थेमुळे ग्रामीण भागातील व्यक्तीही पूर्ण करू शकतात ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न मुख्य फोटो
अमृत संस्थेमुळे ग्रामीण भागातील व्यक्तीही पूर्ण करू शकतात ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील यश राजेंद्र जोशी यांनी अमृत संस्थेचा ड्रोन पायलट कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांनी अमृत संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाला नुकतीच भेट दिली. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांना अमृत संस्थेच्या योजना आणि अन्य कोर्सेसबाबत सविस्तर माहिती दिली. जोशी यांनी अमृत संस्थेचे विशेष आभार मानले. ग्रामीण भागातील व्यक्तीला मोफत हे प्रशिक्षण मिळाले, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटाने विविध योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांनी आवाहन केले. त्यांना अमृत संस्थेची दिनदर्शिका देण्यात आली.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्येच ड्रोन पायलट कोर्सचा समावेश आहे. या ड्रोन पायलट कोर्ससाठी अहिल्यानगरमधील राहुरी येथील यश जोशी यांनीही प्रवेश घेतला होता. तो कोर्स त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्याचे अधिकृत प्रमाणपत्रही त्यांना प्रदान करण्यात आले. या कौशल्याच्या आधारे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला असून, जिद्द आणि मेहनतीचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. यश जोशी यांनी प्रशिक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत मिळालेले मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. अमृत संस्थेच्या माध्यमातून युवकांना आधुनिक व नावीन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याचाच सकारात्मक परिणाम यश जोशी यांच्या यशातून दिसून येतो. ड्रोन तंत्रज्ञानासारख्या आधुनिक व तांत्रिक क्षेत्रात युवकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी यश जोशी यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

अधिक माहितीसाठी

पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,

अहिल्यानगर - 414003

संपर्क क्रमांक : 9112228769

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in



Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 20-01-2026 News publication date | Time: 11:34 PM News publication time | Views: 1,036 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 20-01-2026 News publication date | Time: 11:34 PM News publication time | Views: 1,036 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words