अमरावतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका पाटणे यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन

अमृत संस्थेच्या योजनांबद्दल देण्यात आली माहिती

अमरावतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका पाटणे यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या प्रियंका पाटणे यांची अमृतसखींनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अमृतसखी अश्विनी पुसदकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व अमृत दिनदर्शिका देऊन पाटणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेविषयी आणि योजनांबद्दलची माहिती पाटणे यांना देण्यात आली. पाटणे यांना त्यांच्या प्रभागातील अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील व्यक्तींपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे पोहोचवण्याची विनंती करण्यात आली. त्या विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील काही महिलाही उपस्थित होत्या.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 20-01-2026 News publication date | Time: 11:07 AM News publication time | Views: 345 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 20-01-2026 News publication date | Time: 11:07 AM News publication time | Views: 345 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words