योजनांच्या प्रसारासाठी अमृत संस्थेला करणार सहकार्य
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नगर शहर परिसरातील गरजू आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या शुभेच्छांचे पत्र सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी यांची भेट घेऊन दिले. या वेळी त्यांचे चिरंजीव पुष्कर श्रीकृष्ण कुलकर्णी, अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांच्यासह अमोल अवस्थी व मंगेश निसळ उपस्थित होते. आगामी समाजकार्याला यश लाभावे, अशा सदिच्छा या वेळी कुलकर्णी यांना देण्यात आल्या.
भेटीवेळी झालेल्या संवादात त्यांचे चिरंजीव पुष्कर कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
अमृत ही संस्था संशोधन,प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करून समाजातील लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment