त्यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनाही अमृत दिनदर्शिकेचे वितरण
पुणे : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी एक खास दिनदर्शिका तयार केली आहे. ही दिनदर्शिका पुणे जिल्ह्यातील शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार स्नेहा गिरी-गोसावी व तालुका कृषी अधिकारी सौ. सुवर्णा विजय आदक-कटके यांना भेट म्हणून देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेचे पुणे जिल्हा उप-व्यवस्थापक कमलाकर कुलकर्णी, आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
या मान्यवरांनी या दिनदर्शिकेवर असलेल्या अनेक योजनांची माहिती घेऊन त्याचे कौतुक केले. खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या या स्वायत्त संस्थेकडून अनेक योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या. या योजनांचा प्रसार अगदी सुरुवातीपासून वेगवेगळ्या माध्यमातून होताना दिसत आहे. प्रचार आणि प्रसार या गोष्टींचा भाग म्हणून अमृत संस्थेने दिनदर्शिका प्रकाशित करून त्या माध्यमाद्वारे अतिशय पद्धतशीरपणे माहिती दिली आहे, याचे कौतुक अनेक अधिकाऱ्यांकडून होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment