नाशिक महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक श्याम बडोदे यांचा 'अमृत'तर्फे सन्मान

लक्ष्यित गटातील नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन

नाशिक महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक श्याम बडोदे यांचा 'अमृत'तर्फे सन्मान मुख्य फोटो
नाशिक महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक श्याम बडोदे यांचा 'अमृत'तर्फे सन्मान अतिरिक्त फोटो

नाशिक : नुकत्याच झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत श्याम बडोदे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्काराबद्दल बडोदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

खाडिलकर यांनी बडोदे यांना या वेळी अमृत संस्थेच्या विविध योजनांबाबत सखोल माहिती दिली. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी कार्यरत असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना संस्थेतर्फे राबवल्या जातात. बडोदे यांनी अमृत संस्थेच्या त्यांच्या प्रभागातील लक्ष्यित गटातील नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी दिले. या वेळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परेश पाटील, जयवंत टक्के उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 07:30 PM News publication time | Views: 139 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 07:30 PM News publication time | Views: 139 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words