छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला दिली भेट
छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये ड्रीम्स ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटरच्या संस्थापक संचालिका श्रीमती वनिता शिंदे या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी दिली. अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि उद्योजकतेसाठी मिळणाऱ्या संधी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय चंद्रकांत लंबे यांनी जिल्हा कार्यालयाच्या वतीने प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment