संस्थेतर्फे घेण्यात आल्या विविध समाजांतील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी
परतवाडा (अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या योजनांची माहिती परतवाडा शहरातील विविध समाजातील नागरिकांना देण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर यांनी अमृत संस्थेच्या लक्ष्यित घटकांतील विविध समाजांतील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
ठाकूर समाजाचे प्रदीप ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष आकाश श्रीवास्तव यांनाही अमृत संस्थेच्या विविध लाभदायी योजनांची माहिती सांगण्यात आली. संदीप रेवलानी व नगरसेवक विजय ठवाणी यांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या योजनांची, तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. येत्या काही दिवसांत सिंधी समाजाची मोठी बैठक आयोजित करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
राजेश जोशी यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे परतवाडा शहरातील विविध समाजांतील नागरिकांमध्ये अमृतच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण होत असून, सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment