धुळे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार

पुढील वाटचालीसाठी देण्यात आल्या शुभेच्छा

धुळे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार मुख्य फोटो
धुळे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार अतिरिक्त फोटो

धुळे : नुकत्याच झालेल्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नगरसेवकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सौ. कल्याणी गजेंद्र अंपळकर, सौ. सारिका प्रवीण अग्रवाल, ललित विरभान अरुजा यांचा समावेश आहे. अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांच्या हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांना गौरवण्यात आले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या शुभेच्छांचे पत्र या सर्व नगरसेवकांना देण्यात आले. त्यांच्या राजकीय, सामाजिक जीवनातील पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी प्रामाणिकपणे कार्य करावे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. या सत्कारामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. तसेच, अमृत संस्थेच्या योजनांच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी विलास चंद्रात्रे यांचे सहकार्य लाभले. 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 18-01-2026 News publication date | Time: 11:08 AM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 18-01-2026 News publication date | Time: 11:08 AM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words