नवीन लाभार्थ्यांची अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयाला पहिली भेट

देण्यात आली सविस्तर माहिती

नवीन लाभार्थ्यांची अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयाला पहिली भेट मुख्य फोटो
नवीन लाभार्थ्यांची अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयाला पहिली भेट अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवते. या योजनांच्या नवीन लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयाला पहिल्यांदाच भेट दिली. या भेटीमध्ये लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम, अर्जप्रक्रिया, पात्रतेच्या अटी, तसेच लाभ मिळविण्याची संपूर्ण माहिती सविस्तर देण्यात आली. यासोबतच सर्व लाभार्थ्यांना अमृत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृत कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले आणि अमृत संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, प्रशिक्षण, स्वयंरोजगार, कौशल्यविकास व आर्थिक साह्याच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

नवीन लाभार्थ्यांनी अमृत कार्यालयाला दिलेल्या या भेटीमुळे त्यांना शासनाच्या योजनांची अचूक व सविस्तर माहिती मिळाली असून, भविष्यात अधिकाधिक पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 12:11 PM News publication time | Views: 495 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 12:11 PM News publication time | Views: 495 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words