अमृत संस्थेतर्फे विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुवर्णसंधी; सांगलीत नोंदणी सुरू

अमृत संस्थेतर्फे विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्यासाठी ही संस्था विविध प्रकारचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेत. अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत सांगलीत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती सोबत दिली आहे. 

१) अमृत महाराष्ट्र कम्युनिटी जर्नालिस्ट 

२) अमृत सूर्यमित्र - सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन

३) अमृत आरीवर्क 

४) अमृत बेकरी (क्राफ्ट बेकर)

५) अमृत मोबाइल फिल्म-मेकिंग 

६) अमृत डिजिप्रेन्युअर - डिजिटल आणि सेल्स मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह

७) अमृत अ‍ॅनिमेशन 

८) अमृत अन्नपूर्णा 

९) अमृतपेठ (ई-कॉमर्स मायक्रो एंटरप्रेन्युअर) 

१०) अमृत पर्यटन – टुरिझम कन्सल्टंट 

११) अमृत ग्लॅमर - प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट 

१२) अमृत ई-रिपेअर मित्र 

१३) अमृत जागतिक व्यापार (इम्पोर्ट- एक्स्पोर्ट एक्झिक्युटिव्ह )

१४) अमृत अलंकार - इमिटेशन ज्वेलरी मेकर

१५) अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण 

वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे

१) शैक्षणिक पात्रता : किमान १० वी पास, पदवी व तांत्रिक शिक्षण असल्यास प्राधान्य

अंतिम शिक्षणाची मार्कलिस्ट देणे आवश्यक 

२) जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा किवा शाळा सोडल्याचा दाखला

३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र

४) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा तहसीलदार यांचा दाखला

५) आधार कार्ड व पॅन कार्ड

६) नावात बदल असल्यास : गॅझेट/ विवाह प्रमाणपत्र 

७) आयकार्ड साइज दोन फोटो 

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक अर्जदारांनी अमृत जिल्हा कार्यालयात नावनोंदणी साठी अर्ज करावा. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्जाची हार्ड कॉपी स्वाक्षरी करून त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्व-साक्षांकित करून अमृतच्या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. 

मुदत : २४ जानेवारी २०२६

संपर्क : अमृत संस्थेचे सांगली जिल्हा कार्यालय - ९११२२२८७६६

पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, राजवाडा, सांगली

जिल्हा व्यवस्थापक : शैलेंद्र जहागीरदार ७९७२८३०७५७

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 16-01-2026 News publication date | Time: 03:53 PM News publication time | Views: 156 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 16-01-2026 News publication date | Time: 03:53 PM News publication time | Views: 156 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words