आर्य वैश्य समाजातील तरुणांनी घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

अमरावती विभागीय कार्यालयाला दिली भेट

आर्य वैश्य समाजातील तरुणांनी घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
आर्य वैश्य समाजातील तरुणांनी घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती अतिरिक्त फोटो

अमरावती : आर्य वैश्य समाजातील होतकरू तरुणांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमरावती येथील विभागीय कार्यालयाला नुकतीच भेट दिली. श्री. पेन्शनवार, श्री. कोटावार, श्री. मामेडवार, श्री. अडगुलवार आदी तरुणांचा त्यात समावेश होता. या भेटीमध्ये तरुणांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घेतली.

व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी साह्यभूत ठरणाऱ्या अमृत संस्थेच्या विविध योजना अर्थात कर्जावरील व्याजपरतावा, कौशल्यविकास व आर्थिक साह्याच्या योजना यांबाबत विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी मार्गदर्शन केले. तरुणांनी शिक्षणासोबतच व्यवसाय व उद्योगाकडे वळावे, यासाठी अमृत संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी सांगितले.

या तरुणांमध्ये सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 170 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 170 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words