चंदगडचे नवनिर्वाचित नगरसेवक अमेय सबनीस यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन

सकारात्मक बदल घडवण्यासाठी सहकार्याचे आश्वासन

चंदगडचे नवनिर्वाचित नगरसेवक अमेय सबनीस यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन मुख्य फोटो
चंदगडचे नवनिर्वाचित नगरसेवक अमेय सबनीस यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन अतिरिक्त फोटो

चंदगड (जि. कोल्हापूर) : चंदगड नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल अमेय विलास सबनीस यांचा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. सबनीस यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. अमृत संस्थेचे कार्य चंदगडमधील लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच तालुक्यामधील लक्ष्यित गटातील युवक व महिला यांच्यासाठी संयुक्त उपक्रम राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

नगरसेवक अमेय सबनीस यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात संस्थेच्या उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. समाजहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडवता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्याशी त्यांनी भेट घडवून दिली. या वेळी काणेकर यांनीदेखील चंदगड अर्बन बँकेच्या माध्यमातून समाजाला अर्थिक बळ देऊन या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. या वेळी उपस्थितांना अमृत दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आल्या.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 12:41 PM News publication time | Views: 514 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 12:41 PM News publication time | Views: 514 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words