नांदेड कार्यालयाकडून करण्यात आला सत्कार
नांदेड : सूरमणी धनंजय जोशी यांनी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड कार्यालयाला भेट दिली. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी धनंजय जोशी यांचा सत्कार केला. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या संस्थेच्या योजनांबद्दल माहिती जाणून घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे पुत्र सी-डॅक संस्थेत प्रशिक्षण घेणार आहेत. त्या अनुषंगानेही त्यांनी विशेषत्वाने माहिती घेतली.
सूरमणी धनंजय जोशी यांनी भारतातील अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांत आपले शास्त्रीय गायन आणि अभंगवाणी सादर केली आहे. त्यात तानसेन संगीत महोत्सव, संगीत नाटक अकादमी दिल्ली, बाबा हरिवल्लभ-जालंधर पंजाब, संगीत शंकर दरबार आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाचा २०२५चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मिळाला होता. तीन लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment