अमरावतीतील नामवंत टायपिंग इन्स्टिट्यूट्सकडून अमृत दिनदर्शिकेचे स्वागत

अनेक उमेदवारांना अधिक माहिती मिळण्यासाठी उपयोग होणार

अमरावतीतील नामवंत टायपिंग इन्स्टिट्यूट्सकडून अमृत दिनदर्शिकेचे स्वागत मुख्य फोटो
अमरावतीतील नामवंत टायपिंग इन्स्टिट्यूट्सकडून अमृत दिनदर्शिकेचे स्वागत अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने प्रकाशित केलेल्या अमृत दिनदर्शिकेचे अमरावती शहरातील विविध नामवंत टायपिंग इन्स्टिट्यूट्समध्ये स्वागत करण्यात आले. शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होणाऱ्या लक्ष्यित गटातील उमेदवारांना अर्थसाह्य करणे ही अमृत संस्थेची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत असंख्य उमेदवारांना थेट लाभ मिळाला आहे. अमृत दिनदर्शिकेच्या माध्यमातून आणखी उमेदवारांपर्यंत योजना अधिक प्रभावीपणे पोहोचवणे शक्य होणार असल्याचे मत विविध इन्स्टिट्यूट्सच्या संचालकांनी व्यक्त केले.

कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट संघटनेचे अध्यक्ष व विमल टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. कडू, दत्तात्रय टायपिंग इन्स्टिट्यूटचे पंकज गयाने, रूपाली कम्प्युटर्स आणि टायपिंग इन्स्टिट्यूटचे दिलीप भोंडे, योगीराज कम्प्युटर्सचे ऋषीकेश बुल आदींना अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी भेट देऊन दिनदर्शिकेचे वितरण केले. शहरातील या नामांकित इन्स्टिट्यूट्सनी अमृत दिनदर्शिकेचे कौतुक करून अमृत संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 11:48 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 11:48 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words