फलटणच्या नगराध्यक्षांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन

योजनांच्या प्रसारासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन

फलटणच्या नगराध्यक्षांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण (जि. सातारा) : फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांना अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी अमृत संस्थेच्या विविध सामाजिक, आर्थिक आणि स्वयंरोजगारविषयक विकास योजनांची माहिती नगराध्यक्षांना देण्यात आली. त्यांना अमृत संस्थेची दिनदर्शिकाही सुपूर्द करण्यात आली.

अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, संस्थेमार्फत राज्यभरात विविध विकास उपक्रम राबविले जातात. युवक, महिला, छोटे उद्योजक आणि तळागाळातील गरजू घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार, प्रशिक्षण आणि अर्थसाह्य योजनांची माहिती या वेळी नगराध्यक्षांना देण्यात आली. 

नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणारे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर यांचे पत्र नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांना देण्यात आले. नगराध्यक्ष नाईक-निंबाळकर म्हणाले, की 'अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त काम करत आहे. अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील.'

नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या योजनांची माहिती शहरातील विविध प्रभागांमध्ये पोहोचवणे आणि गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय साधण्याची भूमिका नगराध्यक्षांनी या वेळी व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Avinash kulkarni News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 09:34 AM News publication time | Views: 427 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: Avinash kulkarni News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 09:34 AM News publication time | Views: 427 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words