कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे आयोजन
ठाणे : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनने (केबीबीएफ) ठाणे येथे नुकताच बिझनेस जत्रा कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे ४० विविध उद्योगांचे स्टॉल्स होते. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे ठाणे जिल्हा व्यवस्थापक श्रेयस जोग आणि अमृत महाराष्ट्रचे महेश गर्दे यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सर्व स्टॉल्सना भेटी देऊन सर्व उद्योजकांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती दिली. अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरताव्यासारख्या योजना उद्योजकांना अत्यंत लाभदायक ठरणाऱ्या आहेत. तसेच, कौशल्यविकास आणि उद्योग सुरू करण्याच्या अनुषंगाने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम अमृत संस्थेतर्फे राबवले जातात. अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किफायतशीर पद्धतीने उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी साह्य करतो. ही सारी माहिती कळल्यावर उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आणि योजनांचा लाभ घेण्यासंदर्भात उत्सुकता दर्शवली.
अमृत संस्थेची दिनदर्शिकाही या वेळी सर्वांना वितरित करण्यात आली. पितांबरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते. त्यांनाही अमृत संस्थेची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली. अशा प्रकारच्या योजनांचा लाभ 'केबीबीएफ'च्या सभासदांना कसा करून देता येईल या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा झाली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment