ईश्वरपूरमध्ये अमृत मेळाव्याला चांगला प्रतिसाद

ब्राह्मण सभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

ईश्वरपूरमध्ये अमृत मेळाव्याला चांगला प्रतिसाद मुख्य फोटो
ईश्वरपूरमध्ये अमृत मेळाव्याला चांगला प्रतिसाद अतिरिक्त फोटो

ईश्वरपूर (सांगली) : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये नुकतेच अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. त्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था व ईश्वरपूर ब्राह्मण सभेच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या सुरुवातीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष वैभव उरुणकर यांनी ब्राह्मण सभेत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती सांगून, अमृतच्या अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचा व ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ब्राह्मण समाजातील व्यावसायिकांनी व महिलांनी उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत संस्थेच्या योजनांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षण योजना, व्यवसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच समाजबांधवांनी व्यवसायिक कौशल्य आत्मसात करून त्याआधारे उद्योग-व्यवसायाची सुरुवात करावी. लक्ष्यित गटातील नागरिकांनी त्यांच्या मनातील प्रश्न व शंका विचारल्या. जिल्हा व्यवस्थापकांनी त्यांचे निरसन केले. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांनी आवश्यक कागदपत्रांबद्दल व निवडीच्या निकषांची सविस्तर माहिती दिली.

अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल महेश कलेढोणकर यांनी अमृत जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार, अभिजित कुलकर्णी व उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी अमृतमित्र म्हणून समाजजागृतीचे काम स्वयंसेवी पद्धतीने करण्याची तयारी दर्शवली. समाजातील बंधू-भगिनींनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले .

अधिक माहितीसाठी संपर्क :

शैलेंद्र जहागीरदार - ९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९ 

सांगली जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,

राजवाडा, सांगली - ४१६४१६

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 259 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 259 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words