नीरा नरसिंहपूरला उद्योजकता विकास विषयावर महिलांची बैठक

अमृत संस्थेचा पुढाकार

नीरा नरसिंहपूरला उद्योजकता विकास विषयावर महिलांची बैठक मुख्य फोटो
नीरा नरसिंहपूरला उद्योजकता विकास विषयावर महिलांची बैठक अतिरिक्त फोटो

नीरा नरसिंहपूर (पुणे) : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. श्रीराम महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा सूर्यनारायण दंडवते व त्यांच्या सहकारी महिलांनी उद्योजकता विकास कार्यक्रमाबाबत सकारात्मक चर्चा केली.
बचत गटातील महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा किंवा वाढवावा, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येत्या आठवड्यामध्ये आवश्यक ती सर्व कागदपत्रे पूर्ण करून प्रशिक्षण सुरू होईल. या प्रशिक्षणामुळे महिलांना व्यवसायाचे तंत्र आणि सूक्ष्म कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होणार आहे. या बैठकीत अमृत संस्थेचे कमलाकर कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या बैठकीत महिलांनी उद्योजकतेच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्याचा निर्धार केला. सौ. सुवर्णा दंडवते यांनी बैठकीचे नियोजन केले आणि त्यांच्या सहकारी महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सर्व महिलांना अमृत संस्थेची आणि योजनांची माहिती देण्यात आली. तसेच, अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारी दिनदर्शिकाही सर्वांना भेट म्हणून देण्यात आली.

Publisher: Prathmesh Kulkarni News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 05:09 PM News publication time | Views: 223 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Prathmesh Kulkarni News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 05:09 PM News publication time | Views: 223 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words