रेणापूरमध्ये अमृत दिनदर्शिकेचे स्वागत

नायब तहसीलदारांकडून कौतुक

रेणापूरमध्ये अमृत दिनदर्शिकेचे स्वागत मुख्य फोटो
मुख्य फोटो

रेणापूर (लातूर) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी एक खास दिनदर्शिका तयार केली आहे. ही दिनदर्शिका रेणापूरचे नायब तहसीलदार ए. बी. सोनकांबळे यांना भेट म्हणून देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेचे लातूर जिल्हा उप-व्यवस्थापक विनोद अपसिंगेकर, महसूल सहायक ऋषिकेश फटाले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

त्यांनी या दिनदर्शिकेवर असलेल्या अनेक योजनांची माहिती घेऊन त्याचे कौतुक केले. खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या या स्वायत्त संस्थेकडून अनेक योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या. या योजनांचा प्रसार अगदी सुरुवातीपासून वेगवेगळ्या माध्यमातून होताना दिसत आहे. प्रचार आणि प्रसार या गोष्टींचा भाग म्हणून अमृतने दिनदर्शिका प्रकाशित करून त्या माध्यमाद्वारे अतिशय पद्धतशीरपणे माहिती दिली आहे, याचे कौतुक अनेक अधिकाऱ्यांकडून होत आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 

शुभम मुळजकर - ७३९१०६५४७० 

लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

विनोद अपसिंगेकर - ७४९९४२४३५५ 

लातूर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

कार्यालयाचा पत्ता :

अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,

पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,

मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,

विद्यानगर, लातूर - ४१३५१२ 

७३९१०६५४७०

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 03:25 PM News publication time | Views: 320 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 03:25 PM News publication time | Views: 320 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words