नावीन्यपूर्ण कल्पनेचे सर्व स्तरांतून कौतुक
सोलापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार केलेल्या विशेष दिनदर्शिकेचे सोलापूर जिल्ह्यात वितरण करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांसह, लाभार्थ्यांच्या घराघरांत ही दिनदर्शिका पोहोचत असून, संस्थेच्या या कल्पक उपक्रमावर प्रशासकीय अधिकारी आणि लक्ष्यित गटातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. अनेकदा शासकीय योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचत नाही, ही बाब लक्षात घेऊन 'अमृत'ने ही दिनदर्शिका तयार केली आहे. यात केवळ तारखांची माहिती नसून, संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती आकर्षक स्वरूपात देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासन आणि विविध शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. "शासनाच्या संस्थेने आपल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनदर्शिकेचा असा प्रभावी वापर करणे, हे सुशासनाचे उत्तम उदाहरण आहे," अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील ब्राह्मण, मारवाडी, जैन, राजपूत, अशा विविध समाजांतील ज्या युवकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरत आहे. "घरातील भिंतीवर ही दिनदर्शिका असल्याने आम्हाला आता योजनांच्या अटी आणि पात्रता सहज समजणार आहेत," अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
ही दिनदर्शिका जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२७ (गुढीपाडव्यापर्यंत) अशा १६ महिन्यांच्या कालावधीसाठी आहे. प्रत्येक पानावर क्यूआर कोड (QR Code) देण्यात आला असून, तो स्कॅन करताच योजनेच्या वेबसाइटवर जाता येते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
9112228768/8669589834/9284483216
सोलापूर कार्यालय :
५३७, दक्षिण कसबा दाते गणपती मंदिरासमोर,
श्री समर्थ संकुल पहिला मजला, सोलापूर ४१३००७
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment