दहिसर महिला सामाजिक मंडळाला देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

उद्योजकता विकास कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

दहिसर महिला सामाजिक मंडळाला देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

मुंबई : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेचे मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक प्रणय तीर्थकर यांनी दहिसर तालुक्यातील महिला सामाजिक मंडळाला भेट दिली. तेथील अलका दातार, नीलिमा जोशी यांची भेट घेऊन अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. उद्योजकता विकास, आयात-निर्यात प्रशिक्षण, कौशल्यविकास, स्वयंरोजगार निर्मिती, तसेच युवक व महिलांसाठी रोजगाराच्या संधी याबाबतची माहिती या वेळी देण्यात आली. जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Pranay Tirthakar News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 04:56 PM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: mumbai_suburban Related district of the news
Publisher: Pranay Tirthakar News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 04:56 PM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: mumbai_suburban Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words